Type Here to Get Search Results !

चिमुरडीच्या संवेदनशील प्रकरणावर हसणे महागात!

 



तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्याकडून ३ IPS अधिकारी निलंबित,


 सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव 


मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


तामिळनाडू :- ​तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी एका अत्यंत संवेदनशील प्रकरणावर निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल मोठी आणि धडक कारवाई केली आहे. एका लहान मुलीशी संबंधित अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणावर प्रसारमाध्यमांना (Media Briefing) माहिती देण्यापूर्वी अत्यंत कॅज्युअल वर्तन केल्याचा ठपका ठेवत मुख्यमंत्र्यांनी ३ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. 

​मिळालेल्या माहितीनुसार, हे अधिकारी पत्रकार परिषदेच्या अगदी आधी आपापसात हसताना आणि गंभीर विषयाला हलक्यात घेताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. हे प्रकरण एका चिमुरडीशी संबंधित असल्यामुळे संवेदनशीलतेचा अभाव दाखवणाऱ्या या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निलंबनाची कुऱ्हाड चालवली. 

​ जबाबदार नेतृत्वाचे उदाहरण:

मुख्यमंत्र्यांच्या या धडक आणि त्वरित निर्णयाचे सोशल मीडियावर जोरदार स्वागत केले जात आहे. अनेक नेटकऱ्यांनी या कारवाईचे कौतुक केले असून, याला 'जबाबदार आणि संवेदनशील नेतृत्वाचे' एक उत्तम उदाहरण म्हटले आहे. गंभीर प्रकरणांमध्ये प्रशासनाने आणि पोलिसांनी कशी संवेदनशीलता दाखवायला हवी, याचाच हा एक कडक संदेश मानला जात आहे.

Post a Comment

0 Comments