Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

अन्न व औषध प्रशासनाचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच राज्यातील भेसळखोरांवर मोठी कारवाई केली.




अवघ्या 3 दिवसांत 53 धाडी टाकत लाखो रुपयांचा माल जप्त केला.


मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


मुंबई :- राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अनधिकृत आणि बेकायदेशीर आस्थापनांना कडक इशारा देत  प्रशासनाने मुंबई, पुणे आणि नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त केला आहे.


तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी (Food Safety Officers) राज्यातील विविध संशयास्पद भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकले. यामध्ये प्रामुख्याने गुटखा, पानमसाला व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या प्रकरणी एकूण 53 आस्थापनांची कसून तपासणी करण्यात आली. त्यापैकी 34 ठिकाणी बंदी असलेला गुटखा आणि पानमसाल्याची सर्रास विक्री होत असल्याचे रंगेहात आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 25 एफआयआर (FIR) दाखल केले असून गुन्ह्यात सामील असलेल्या 33 व्यक्तींना अटक केली आहे. तसेच गुटखा वाहतूक करणारी 5 वाहने जप्त करून 27 आस्थापनांना थेट सील ठोकण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments