Type Here to Get Search Results !

महाराष्ट्राला काळीमा! आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून जन्मदात्या बापानेच केला पोटच्या लेकीचा निर्घृण खून!




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


कल्याण :- पुरोगामी महाराष्ट्रात आजही जातीभेदाची पाळेमुळे किती घट्ट रुजलेली आहेत, याचा एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक प्रत्यय कल्याण शहरात समोर आला आहे. केवळ दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केले म्हणून समाजात बदनामी झाल्याच्या खोट्या प्रतिष्ठेपोटी एका जन्मदात्या पित्याने आपल्या २५ वर्षीय पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केली आहे!  विनयभंग

 काय आहे संपूर्ण घटना?

खोट्या प्रतिष्ठेचा बळी: कल्याण पश्चिम भागातील रचना रॉयल इमारतीत राहणाऱ्या गायत्री शिंदे (वय २५) हिने नोव्हेंबर २०२५ मध्ये घरच्यांचा विरोध पत्करून स्वतःच्या पसंतीच्या तरुणासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. यामुळे तिचे वडील विनोद वसईकर (वय ५०) हे कमालीच्या रागात होते.

घरी परतताच घडला अनर्थ: काही दिवसांपूर्वी गायत्री माहेरी आली होती. सोमवारी दुपारी घरात कोणी नसताना आंतरजातीय विवाहाच्या जुन्या कारणावरून बाप-लेकीमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात विनोदने तीक्ष्ण हत्याराने गायत्रीवर सपासप वार केले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने गायत्रीचा जागीच मृत्यू झाला. 

तीन दिवसांनंतर आरोपी गजाआड: हत्या केल्यानंतर आरोपी वडील तिथून पसार झाला होता. रात्री गायत्रीच्या आईने रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मुलीचा मृतदेह पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली. बाजारपेठ पोलिसांनी तांत्रिक तपास आणि मोबाईल लोकेशनच्या मदतीने शोध घेत अखेर तीन दिवसांनंतर नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत!

Post a Comment

0 Comments