Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

जनता कॉलेज जवळील लष्करी ईदगाह मैदान येथे शिवसेना परिवाराच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


चंद्रपूर :- आज दिनांक 28-05-2026 रोजी बकरी ईदच्या पवित्र सणानिमित्त, जनता कॉलेज जवळील लष्करी ईदगाह मैदान येथे शिवसेना परिवाराच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संदीपभाऊ गिऱ्हे, चंद्रपूर मनपा उपमहापौर श्री. प्रशांत दानव साहेब, चंद्रपूर स्थायी समिती सभापती सौ. मनस्वीताई संदीप गिऱ्हे, माजी जिल्हाप्रमुख श्री. सतीशभाऊ भिवगडे, चंद्रपूर मनपा नगरसेवक आकाशभाऊ साखरकर, नगरसेविका सौ. श्रुतीताई घटे, सौ. श्वेताताई विप्लव लांडगे, सुमितभाऊ अग्रवाल, राकेशभाऊ घटे, सिकीभैया खान, बाबाभाई शेख, तन्वीरभाई शेख, विप्लव लांडगे इत्यादी मान्यवर आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांना गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि शहरात धार्मिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

Post a Comment

0 Comments