Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

अखेर वीज वितरण कंपनी, शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन पुढे नमले....!




✍️श्री.निलेश सोनवणे✍️

    (जळगांव प्रतिनिधी)

    (मो : 9922783478)


जळगांव प्रतिनिधी – आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रमुख मागण्या 

१) शेतकऱ्यांना विना खंडित सलग दहा तास वीजपुरवठा मिळायलाच पाहिजे.

२) विद्युत कायदा 2003 च्या कलम 43 आणि 57 नुसार आम्हाला सुरळीत वीज मिळणे हा आमचा हक्क आहे.आमच्या शेतकऱ्यांच्या गेल्या महिनाभरापासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे.यामुळे आमच्या पिकांचे नुकसान होत आहे हा महाराष्ट्र विद्युत नियमक आयोग (MERC ) च्या गुणवत्ता मानकाचा (SOP ) चा भंग आहे,हा पुरवठा त्वरित सुरू न झाल्यास आम्ही CGRF,विद्युत लोकपाल,ग्राहक मंचात भरपाईसाठी दावा दाखल करू,असा इशारा शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला आहे.


हे आंदोलन यशस्वी झाले असून जळगांव ग्रामीण,चाळीसगाव सह जळगांव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सलग ८ तास वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे असे आश्वासन अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी दिले तसेच वीजवितरण कंपनी च्या वतीने कार्यकारी अभियंता यांनी लेखी प्रत देण्यात आली.


यावेळी शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे,महिला जिल्हा अध्यक्ष कल्पिता ताई पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील,शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद घुगे,माजी अध्यक्ष अशोक लाडवंजारी,एजाज मलिक,महेश बोरसे तालुकाध्यक्ष रिंकू चौधरी महानगर,संग्राम पाटील,प्रेमराज राठोड,योगेश पाटील,डॉ.रमाकांत कदम,प्रमोद सोनवणे,स्वप्नील राजपूत, सुमित सपकाळे,संजय जाधव,योगेश पाटील,वाय.एस.महाजन,संजय जाधव,हिलाल पाटील बाळू धनगर बाळू पाटील,प्रवीण पाटील व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments