जिल्हा प्रतिनिधी जळगांव
धरणगांव :– सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रसिद्ध अभिनेत्री सुनेत्रा महाजन यांच्या हस्ते *रविंद्र नानाजी पाटील* यांना आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन आयोजित *‘महाराष्ट्र भूषण सन्मान 2026* ’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो. यावर्षी सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत *रविंद्र नानाजी पाटील* यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
पुरस्कार स्वीकारताना *रविंद्र नानाजी पाटील* यांनी हा सन्मान आपल्या कुटुंबीयांचा, सहकाऱ्यांचा व सर्व हितचिंतकांचा असल्याचे सांगितले.
*श्री.बापूसाहेब आर.डी.पाटील सर* यांच्या आशीर्वादाने समाजाच्या प्रगतीसाठी आणि जनसेवेसाठी भविष्यातही अधिक जोमाने कार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या यशाबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
*रविंद्र नानाजी पाटील* यांना प्राप्त झालेला ‘ *महाराष्ट्र भूषण सन्मान 2026* ’ हा त्यांच्या कार्याचा गौरव असून, समाजसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

Post a Comment
0 Comments