Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

नागपूर महानगरपालिकेतर्फे 5 जून 'पर्यावरण दिना'पासून ते 21 जून 'योग दिना'पर्यंत 'पर्यावरण व स्वच्छता पंधरवाडा' साजरा करणार!




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की नागपूर महानगरपालिकेतर्फे 5 जून 'पर्यावरण दिना'पासून ते 21 जून 'योग दिना'पर्यंत 'पर्यावरण व स्वच्छता पंधरवाडा' साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून, बांधकाम क्षेत्राशी संबंधित संस्थांचे सहकार्य मिळावे याकरिता मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयात बैठक (ता.03) आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीत उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवाणी दाणी-वखरे, सत्ता पक्ष नेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगररचना उपसंचालक श्री.गिरीश गोडबोले, सहायक संचालक श्री. ऋतुराज जाधव, श्री. राजमोहन शाहू, श्री.अर्चित गुप्ता,  डॉ. कुणाल पडोळे, श्री. अजय बोरकर, श्री.अच्च्युत गाडगे, श्री. नरेद्र हटवार, श्री. प्रशांत ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments