Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

आज रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने भव्य "आरक्षण बचाव यात्रा"

 



या यात्रेचे उत्कृष्ट नियोजन ऑल इंडिया पँथर सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश भालेराव यांनी केले.


मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


 रायगड (खालापूर ) :- सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की ऑल इंडिया पँथर सेनेचे

राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार ,यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.


यावेळी महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे,

 महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, महाराष्ट्र सचिव जितेश भाई जगताप

 नांदेड जिल्हाध्यक्ष माधव भालेराव

 तसेच विदर्भ युवक अध्यक्ष संकेत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.


आरक्षण हे संविधानाने दिलेले हक्काचे संरक्षण असून ते अबाधित राखण्यासाठी व समाजात जनजागृती करण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समाजबांधव सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments