मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
राजुरा : - आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर परिसरातील युवकांचा काँग्रेसकडे वाढता कल पुन्हा एकदा दिसून आला आहे. बल्लारपूर काँग्रेसचे नेते तथा जिल्हा परिवहन अध्यक्ष नरेश मुंदडा आणि बल्लारपूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेश आनंद यांच्या नेतृत्वाखाली चेतन गेडाम, शरद अलोने यांच्यासह अनेक युवकांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते काँग्रेस जनसंपर्क कार्यालय राजुरा येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी नव्याने पक्षात दाखल झालेल्या युवकांचे स्वागत करण्यात आले. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे मत उपस्थित नेत्यांनी व्यक्त केले. या प्रसंगी युवकांमधील संघटनात्मक कार्याची दखल घेत चेतन गेडाम यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीमुळे युवक काँग्रेसला बळ मिळणार असून पक्षाच्या विचारधारेचा प्रसार तळागाळापर्यंत करण्यासाठी ते प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.
यावेळी बल्लारपूर ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष गणपत इटणकर, अनुसूचित जमाती विभाग काँग्रेसचे अध्यक्ष नितीन सोयाम, सोशल मीडिया कार्यकारी अध्यक्ष संदीप टोंगे, मंगेश बावणे, संजय जिल्लेवार, महादेव ढबडे, रोहित आमटे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments