सुनील भोसले
पुणे शहर प्रतिनिधी
9146241956
पुणे :- मनपा शाळा क्रमांक 162 हनुमंतराव थोरवे पीएमसी शाळेची विद्यार्थिनी विश्वजा गोगावले आणि हुजूरबागा शाळेची विद्यार्थिनी मेघा नांदखिले यांनी इंदोर मध्यप्रदेश येथे नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्राला किक बॉक्सिंग चॅम्पियन चा मान मिळवून दिल्याबद्दल माणूस परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मनपा शाळा क्रमांक 162 भारती विद्यापीठ येथे या दोन छोट्या रणरागिणींचा व त्यांचे कोच यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला या वेळी माणूस परिवार महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष : मा.दुष्यंतराजे जगताप, सामाजिक कार्यकर्ते मा.प्रशांत गांधी, मा. मंगेश कंक, पुणे महानगरपालिका क्रीडा अधिकारी मा.स्वाती गायकवाड मॅडम, मा.श्रीपाद जगताप सर, शाळेच्या मुख्याध्यापिका मा.राणी कुलकर्णी मॅडम, मा. अविनाश गोगावले, मा. विशाल नंदखिले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.संगीता बागुल मॅडम, मा.गायत्री शितोळे मॅडम, विश्वजाच्या शिक्षिका चित्रा सोनावणे ,भिलारे मॅडम व सर्व शिक्षक वर्ग व सहकारी वर्ग उपस्थित होता
या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व यांचे प्रोत्साहन यांचा सत्कार बघून अनेक विद्यार्थी घडावे या दृष्टीने हा छोटासा कार्यक्रम घेण्यात आला होता .यावेळी विश्वजाचे कोच विक्टोरिया स्पोर्ट्स फाउंडेशन चे शुभम सरोज व सिद्धार्थ शर्मा यांनाही सन्मानीत करण्यात आले.या कार्यक्रमाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल शाळेचे कौतुक शाळेतील शिक्षकांचे कौतुक आणि ज्या विद्यार्थ्यांनी हे गोल्ड मेडल्स पटकावलं अशा विद्यार्थ्यांच्या कोच व त्यांचे आई वडील यांचेही माणूस परिवाराच्या वतीने आभार मानण्यात आले

Post a Comment
0 Comments