Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेस कडून राजेंद्र जैन यांची राज्यसभेसाठी घोषणा - प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे




 राजेंद्र जैन यांना प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून केलेल्या कामाची मिळाली पावती !


✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847


भंडारा : ( दिनांक ८ जून २०२६) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाशी मी सुरुवातीपासून जुळलो आहे. आजपर्यंत पक्षासोबत नेहमीच प्रामाणिक राहून काम केले. त्याची पावती मला आज मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते आणि तमाम कार्यकर्ता यांच्या विश्वासाने इथपर्यंत पोहचता आले.  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मी आतापर्यंत काम करीत आलो आहे. यापुढेही पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम करीत राहणार असे राजेंद्र जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले. 


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रिक्त झालेल्या जागेवर कुणाची वर्णी लागणार यावरुन गेल्या आठवडाभरापासून विविध चर्चा सुरू होत्या. त्यासाठी अनेक नावांची चर्चा होती. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा केली. राजेंद्र जैन हे खा. प्रफुल्ल पटेल याचे विश्वासू असून गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव आहेत. तसेच यापुर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव सुध्दा होते. सहकार क्षेत्रात त्यांची चांगली पकड आहे. यापुर्वी ते दोनदा भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेचे आमदार राहिले आहे. सध्या होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांना संधी न मिळाल्याने पक्ष त्यांना मोठी जबाबदारी सोपवेल अशी चर्चा होती. त्या चर्चेला राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुजोरा मिळाला आहे. रविवारी रात्री उशिरा त्यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या घोषणेचे स्वागत केले.


*कोण आहेत राजेंद्र जैन* 

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) एक निष्ठावान नेते असून, पक्षाचे विदर्भातील महत्त्वाचे संघटक मानले जातात. प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय असून त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये पक्षाचे निरीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. यापूर्वी, ते २००४ ते २०१६ पर्यतं विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते. तर, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये ते महत्त्वाचे मानले जातात. नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या वेळीही त्यांच्या नावाची पक्षाच्या कोअर कमिटीत प्रबळ दावेदार म्हणून चर्चा झाली होती.

Post a Comment

0 Comments