Type Here to Get Search Results !

अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर बीड एसीबीची धडक कारवाई




 ६ लाख ४० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक!


मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


जालना :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर बीड एसीबीची धडक कारवाई; ६ लाख ४० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक!

​जालना जिल्ह्यातील महसूल विभागात आज एकच खळबळ उडाली आहे. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.  

​काय आहे सविस्तर प्रकरण?

शिकायतदाराच्या ६ हायवा गाड्यांवर आणि पोकलेन मशीनवर कोणतीही जप्ती किंवा दंडात्मक कारवाई न करण्यासाठी तहसीलदार चव्हाण यांनी दरमहा ७ लाख रुपयांच्या 'मासिक हप्त्याची' (मंथली) मागणी केली होती. तडजोडीअंती ६ लाख ४० हजार रुपये देण्याचे ठरले. हा लाचेचा सौदा ठरल्यानंतर, बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगरमधील कासलीवाल मार्वल सोसायटीतील त्यांच्या आलिशान निवासस्थानाबाहेर सापळा रचण्यात आला आणि चव्हाण यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

​या धडक कारवाईमुळे वाळू माफिया आणि महसूल अधिकाऱ्यांचे असलेले आर्थिक लागेबांधे उघड झाले आहेत.

Post a Comment

0 Comments