✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847
भंंडारा :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (५ जून) संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण संवर्धन आणि रक्षणाचे विविध उपक्रम राबवले जात आहेत। वाढते तापमान, जंगलतोड आणि पाणीटंचाई या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी सामूहिक जबाबदारीवर भर दिला जात असून, 'एक झाड आईच्या नावाने' यांसारख्या मोहिमांतून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व संवर्धन केले जात आहे.
पर्यावरणाचे संवर्धन आणि रक्षण, संगोपन लोकांना निसर्गप्राप्ती जागरूक करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. १९७२मध्ये संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाची सुरुवात केली होती. आणि तेव्हापासूनच हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
*त्यासंदर्भातील घेतलेला हा वृत्तांत*
दिवसेंदिवस पर्यावरणाचा संतुलन बिघडत आहे. त्याला जबाबदार कोण असेल तर तो म्हणजे माणूसच! कारण की तो वृक्षतोड करतो त्या वृक्षाची जळतन म्हणून वापर करतो परंतु वृक्षाची लागवड करायला पाहिजे ती काही करत नाही.माणसाच्या या स्वार्थी प्रवृत्तीमुळेच निसर्गाचा समतोल बिघडत आहे. त्याचा परिणाम असा होतो की वेळेवर पाऊस यायला पाहिजे तो येत नाही. कारण की वृक्षतोड ही भरपूर प्रमाणात होते. त्या प्रमाणात वृक्षाची लागवट होत नाही. पर्यायाने निसर्गाची हानी झाल्याशिवाय राहत नाही. पर्यावरण संवर्धनात माणसांनी हातभार लावण्यासाठी कृती करणे आवश्यक आहे.
जसे १)झाडे लावणे :- प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरी किंवा परिसरात किंवा कुंडीत कमीत कमी एक रोपटे लावून त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. २) प्लॅस्टिक बंदी :- सिंगल युज प्लास्टिकचा वापर शक्यतोवर टाळले पाहिजे आणि कापडी पिशव्यांचा वापर करण्यास सुरुवात केली पाहिजे. ३) पाणी व ऊर्जेची बचत :- आपल्या आवश्यकतेनुसारच विजेचे दिवे- पंखे चालू ठेवावा आणि पाण्याचा अपव्यय शक्यतोवर टाळावा ४) स्वच्छता मोहीम :- आपल्या परिसरातील रस्ते उद्याने किंवा जलस्त्रोत यांच्या स्वच्छतेसाठी मित्र परिवारासोबत किंवा शेजाऱ्या- पाजार्यासोबत मिळून स्वच्छतेची मोहीम राबवणे आवश्यक आहे. ५)"जागरूकता वाढवणे :- सोशल मीडियाद्वारे किंवा त्या परिसरातील लोकांना एकत्रित करून "झाडे लावा -झाडे जगवा" चा संदेश देणे आवश्यक आहे. *जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व* :-
पर्यावरण म्हणजे केवळ झाडे, नद्या, नाले किंवा पर्वत नव्हे, तर आपल्या जीवनाचा तो एक अविभाज्य भाग आहे, मानवाच्या प्रगती सोबतच पर्यावरणावर वाढत असलेला ताण ही आज जगासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. वाढते तापमान प्लास्टिक प्रदूषण आणि घटती जैवविविधता यावर मात करण्यासाठी हा दिवस आपल्याला योग्य दिशेने पावले उचलण्याची प्रेरणा देतो.
*पर्यावरण दिनाचा संक्षिप्त इतिहास* :-
१)सुरुवात:- संयुक्त राष्ट्रांनी १९७२ मध्ये मानवी पर्यावरणावर स्टॉक होम येथे पहिली परिषद आयोजित केली होती. २) घोषणा :- या परिषदेच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रांनी पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याची मान्यता दिली. ३) पहिला दिवस:- १९७४ मध्ये प्रथमच ५ जून हा दिवस अधिकृतपणे पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात आला.
याच पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भंडारा येथील उत्साही ज्येष्ठ नागरिकांनी ओबीसी क्रांती मोर्चा चे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारून सोबतच्या मित्रमंडळींना आपल्या परिसरात प्रत्येकानी एक वृक्ष लागवड करून त्याचे रक्षण संवर्धन आणि संगोपन करण्याची प्रतिज्ञा सर्वांनी केली. त्यात संजय मते ओबीसी क्रांती मोर्चा चे संस्थापक अध्यक्ष, सेवानिवृत्त प्राध्यापक विद्यानंद भगत, प्रसिद्ध सुवर्णकार प्रतीन फाये, यशवंत गायधने, ओमप्रकाश मोहबंशी,
*प्रतिक्रिया* :- मानव इतका निष्क्रिय झाला आहे की तो स्वतःच्या सुखासाठी ५० ते ६० हजार रुपये खर्च करून कुलर, पंखे व एसी खरेदी करतो परंतु केवळ ५० रुपये खर्च करून तो एक झाड घेऊन वृक्षारोपण करू शकत नाही. वृक्ष मानवाला ऑक्सिजन पुरवठा करतो परंतु माणसाला याचे महत्त्व कळतं नाही. कालांतरानं याचे दुष्परिणाम त्यालाच भोगावे लागेल. आणि या परिस्थितीला जबाबदार तो स्वतः राहील.
वृक्ष हा कधीच भेदभाव करत नाही. तो राजालाही तेवढीच सावली देतो आणि रंकालाही तेवढीच सावली देतो. वृक्ष हा "राव व रंक" असा भेदभाव कधीही करत नाही. असे प्रतिपादन वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments