मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक ✍🏻
8208166961/9860020016
गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील मौजा गुरवळा, हिरापूर, शिरपूर चक व राखी येथील प्रस्तावित विमानतळ तसेच चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनी बळजबरीने अधिग्रहित न करता पर्यायी जागेचा विचार करण्यात यावा, या न्याय्य मागणीसाठी गडचिरोली जिल्हा, शेतकरी संघर्ष कृती समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष भेट घेत निवेदन दिले.
सुपीक शेतजमीन हाच आमच्या बळीराजाच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. विकासकामांना आमचा विरोध नाही, मात्र शेतकऱ्यांना भूमिहीन करून किंवा त्यांच्या इच्छेविरुद्ध होणारा विकास कदापि मान्य नाही.
या प्रकरणात मी स्वतः जातीने लक्ष घालून, संबंधित प्रशासनाकडे व शासनाकडे या अधिसूचना रद्द करण्यासाठी तात्काळ पाठपुरावा करेन. अन्नदात्या बळीराजाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, अशी ग्वाही याप्रसंगी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना दिली.

Post a Comment
0 Comments