Type Here to Get Search Results !

गोंडवाना विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती!: आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


चंद्रपूर :- आज मंत्रालयात मा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोंडवाना विद्यापीठाच्या कॅम्पस विकास आराखड्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

यावेळी विकास आराखड्याचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या संदर्भातील चर्चेनंतर मा. मंत्रिमहोदयांनी पहिल्या टप्प्यात ₹500 कोटींचा विकास आराखडा तयार करून तो तातडीने उच्चस्तरीय समितीकडे मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश दिले.

तसेच, येत्या १५ दिवसांत अंतिम विकास आराखडा पूर्ण करून सादर करण्याचे स्पष्ट आदेश मुख्य अभियंत्यांना देण्यात आले.

विदर्भातील उच्च शिक्षणाच्या पायाभूत सुविधांना नवी उंची देत, गोंडवाना विद्यापीठाला आधुनिक आणि जागतिक दर्जाच्या कॅम्पसकडे नेणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे!

यावेळी विभागाचे सचिव वेणूगोपाल रेड्डी, मुख्य अभियंता सयाजी माने, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ.प्रशांत जी बोकारे हे दुरदृश्य प्रणालीद्वारे व इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments