Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

पालघर एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची बैठक संपन्न




अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 


आमदार राजेंद्र गावित यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ट्रामा केयर, प्राथमिक आरोग्य केंद्र, उप केंद्र यांचे वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांची आरोग्य, पोषण, स्वच्छता, बांधकाम, महिला व बाळ आरोग्य इ. समितिची बैठक पालघर नगराध्यक्ष उत्तम घरत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष चौधरी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळुंखे, गट विकास अधिकारी पालघर, नाळे, वैद्यकिय अधीक्षक डॉ. लोहारे, डॉ शिंदे यांच्या समवेत पार पडली

सदर बैठकीत आमदार राजेंद्र गावित ह्यांनी केंद्र व राज्य सरकार विविध शासकीय रुग्णालय व समिती स्थापन्न करून लोकाभिमुख व पारदर्शक आरोग्य व्यवस्थे करिता निधी देत असते तरी सुद्धा पालघरच्या आरोग्य व्यवस्थेला मुंबई, सिल्वासा, नाशिक, वलसाड सारख्या ठिकाणी रेफर केले जाते. ही खेदाची बाब आहे. मागील वर्षातील स्नेक बाईट, डॉग बाईट ची आकडेवारी समोर ठेवून रेबीजमुळे दगावले रुग्ण, 102 व 108 वेळेवर उपलब्ध न होणे, आशा स्वयंसेविका व कंत्राटी कर्मचारी यांचे मानधन त्याच बरोबर आदिवासी व इतर समाजातील व्यसनाधीनता बालविवाह, कुपोषण सारख्या समस्या संदर्भात चर्चा करून  उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत.

Post a Comment

0 Comments