मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
चंद्रपूर :- आज जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील विविध विकासकामे, मान्सूनपूर्व तयारी, सिव्हरेज प्रकल्प, अमृत योजना, वीजपुरवठा, नजूल पट्टे, घुग्घुस नगर परिषद इमारत तसेच आगामी महाकाली महोत्सव २०२६ संदर्भात सविस्तर आढावा बैठक घेतली. मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना पावसाळ्यात कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. रखडलेली विकासकामे गतीने पूर्ण करणे, सिव्हरेज व अमृत योजनेची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणे तसेच वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला.
बैठकीत घुग्घुस नगर परिषदेसाठी नव्या इमारतीच्या प्रस्तावाचाही आढावा घेतला. सोबतच चंद्रपूर शहरातील आणि घुघुस येथील नजूल जागेवरील नागरिकांना स्थायी पट्टे देण्याच्या विषयावरही चर्चा केली. सोबतच याविषयी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी अधिकाऱ्यांना दिले. याशिवाय शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभवाचे जतन करण्याच्या दृष्टीने राजमाता जिजाऊ, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि गोंडवाना साम्राज्याच्या शूर राणी हिराई यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या उभारणीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. या स्मारकांमुळे भावी पिढीला प्रेरणा मिळेल आणि शहराच्या सांस्कृतिक वारशाला नवी ओळख प्राप्त होईल.

Post a Comment
0 Comments