Type Here to Get Search Results !

राजस्थानात महाराष्ट्राच्या डॉ. निलेश राणे यांच्या नावाचा डंका; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभ ते समारोपापर्यंत प्रमुख भूमिका




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


मुंबई :- राजस्थान राज्यात आयोजित करण्यात आलेल्या १० व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे डॉ.निलेश राणे यांच्या नेतृत्वाचा आणि कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठित स्पर्धेच्या शुभारंभ आणि समारोप या दोन्ही कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती लाभल्याने राजस्थानात त्यांच्या नावाचा डंका गाजला.


दुसऱ्या राज्यात आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुपुत्राला शुभारंभ व समारोप या दोन्ही कार्यक्रमांचे नेतृत्व करण्याचा मान मिळणे ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे. डॉ.राणे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर तीन दिवस चाललेल्या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांतील खेळाडूंनी उत्साहाने सहभाग घेत उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले.


स्पर्धेदरम्यान डॉ.राणे यांनी विविध राज्यांतील खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच राष्ट्रीय स्तरावर क्रीडा विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवरही चर्चा केली.


समारोप सोहळ्यात डॉ.निलेश राणे यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पदके, ट्रॉफी आणि सन्मानचिन्हे प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले.


राजस्थानमध्ये मिळालेला हा सन्मान महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी गौरवास्पद ठरला असून, डॉ.निलेश (दादा) राणे यांच्या नेतृत्वाची आणि कार्याची राष्ट्रीय स्तरावर होत असलेली दखल अधोरेखित करणारा ठरला आहे.

Post a Comment

0 Comments