Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील दहावीच्या वर्गातील 1100 विद्यार्थ्यांना अमृतछाया अभियान अंतर्गत रेनकोट व छत्रीचे वितरण




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016


नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील दहावीच्या वर्गातील 1100 विद्यार्थ्यांना अमृतछाया अभियानाअंतर्गत रेनकोट व छत्रीचे वितरण महापौर श्रीमती निता ठाकरे, आमदार श्री. कृष्णा खोपडे व शिक्षण विशेष समिती सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा यांच्या हस्ते करण्यात आले.


नागपूर महानगरपालिका व रोटरी क्लब ईशान्यच्या संयुक्त विद्यमाने हा अमृतछाया अभियान कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित केला होता. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, नेहरुनगर झोन सभापती श्रीमती ज्योती देवघरे, उपसभापती श्रीमती भारती बुंदे, नगरसेविका वैशाली उदापूकर, नगरसेविका श्रीमती वर्षा डोंगरे, सहायक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर, शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना महाजन, रोटरी क्लबचे श्री. निलेश राठी, श्री. धीरज साबू उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments