Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त 5 सफाई कर्मचारी अशा 10 झोनमधील एकूण 50 सफाई कामगारांचा सत्कार




मनोज एल खोब्रागडे

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की नागपूर मनपाच्या  घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे 31 जुलै या शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त शहरातील प्रत्येक झोनमधील उत्कृष्ट सेवा देणार्या 5 सफाई कर्मचारी अशा 10 झोनमधील एकूण 50 सफाई कामगारांचा सत्कार महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला  हाथीबेड, स्थायी समितीच्या  सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समितीच्या सभापती श्रीमती रुतिका मसराम, महिला व  बाल कल्याण विशेष समितीच्या  सभापती श्रीमती सारिका नांदूरकर, नगरसेवक मनोज साबळे व अतिरिक्त आयुक्त श्री. मुरगानंथम एम. यांच्या हस्ते करण्यात आला.


डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शाल, श्रीफळ, तुळशीचे रोपटे व 5 हजार रुपये रोख असे या सत्काराचे स्वरुप होते. यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह प्रत्येक झोनचे स्वच्छता अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments