Type Here to Get Search Results !

मित्रांमधील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला सामूहिक केली मारहाण.




त्रिशा राऊत नागपूर जिल्हा क्राईम रिपोर्टर मो.9096817953


नागपूर.मित्रांमधील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला सामूहिक मारहाण करून त्याची सोन्याची साखळी आणि मोबाईल हिसकावल्याची धक्कादायक घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिटणीस पार्क परिसरातील रहिवासी आवेश खान अहमद खान हा १६ जुलै रोजी दुपारी बुटीबोरीहून जेवण करून घरी परतत होता. वाटेत त्याची भेट मित्र लकी ठाकूर याच्याशी झाली. त्यावेळी लकीचा वेदांत नावाच्या युवकासोबत फोनवर वाद सुरू होता.


आवेशने हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. गवळीपुरा येथील लक्ष्मी प्लायवूडजवळ वेदांतची भेट झाल्यानंतर त्याने दोन्ही बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेदांतने आपल्या साथीदारांना घटनास्थळी बोलावल्याचा आरोप आहे.यानंतर गौरव राजू बिलसे, वेदांत, राम धर्मेश दांदडे, लक्ष्मण धर्मेश दांदडे, आशीष यादव, आदित्य यादव, कृष दांदडे, ऋषभ बबलू दांदडे, साहिल यादव आणि शुभम यादव यांनी एकत्रितपणे आवेशला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर आरोपींनी त्याची सोन्याची साखळी आणि मोबाईल फोन हिसकावून घटनास्थळावरून पलायन केल्याची तक्रार करण्यात आली आहे.


पीडिताच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी १० जणांविरुद्ध मारहाण आणि लुटीचा गुन्हा नोंदवला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments