Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

अम्मा का टिफिन उपक्रमाला मिळाला श्री सत्य साई संस्थांचा आशीर्वाद




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चंद्रपूर :- आज श्री सत्यसाई परिवाराचे सदस्य तथा श्री सत्यसाई सेवा संस्थेचे प्रमुख मा. रत्नाकरजी यांची सदिच्छा भेट घेण्याचा योग आला.

   यावेळी आपल्या वतीने सुरू असलेल्या “अम्माचा का टिफिन” या समाजोपयोगी उपक्रमाची सविस्तर माहिती त्यांना दिली. निराधार, गरजू आणि उपाशीपोटी राहणाऱ्या बांधवांपर्यंत प्रेमाने अन्न पोहोचविण्याची ही संकल्पना त्यांना अत्यंत भावली.

     विशेष आनंदाची बाब म्हणजे, जगातील १६० देशांमध्ये सेवाकार्य करणाऱ्या श्री सत्यसाई सेवा संस्थेच्या सेवाभावी उपक्रमांमध्ये “अम्माचा टिफिन” या संकल्पनेचा समावेश करण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. ही बाब आमच्यासाठी अभिमानाची असून, या उपक्रमाच्या सामाजिक परिणामकारकतेची पावती आहे.

   निराधारांसाठी अन्न, वस्त्र, आरोग्यसेवा, औषधोपचार आदी विविध सेवाभावी कार्य करणाऱ्या या संस्थेने “अम्माचा का टिफिन” उपक्रमाला या संस्थेचा आशीर्वाद मिळाला हीच आमच्या कार्याची पावती आहे. या सहकार्यामुळे अधिकाधिक गरजूंना प्रेम, सेवा आणि माणुसकीच्या भावनेतून अन्न पोहोचविण्याच्या कार्याला निश्चितच नवी गती मिळेल.

  ‘सेवा हीच खरी साधना’ या भावनेतून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.

Post a Comment

0 Comments