मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
मंत्रालय (मुंबई) :- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील निमणी, बेंद्री, नागाव (नि), शिरगाव (कवठे) आणि नेहरूनगर या गावांसाठी जलजीवन मिशनअंतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. यापैकी बेंद्री आणि शिरगाव (कवठे) येथील योजनांची कामे पूर्ण झाली असून निमणी आणि नागाव (नि) येथील कामे प्रगतीपथावर आहेत. नेहरूनगर येथील योजनेचे जलस्रोत निकामी झाल्यामुळे काम पूर्ण होऊ शकले नसल्याने या गावासाठी नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील ज्या पाणीपुरवठा योजनांची अंदाजित किंमत ₹५० लाखांपर्यंत आहे, अशा सर्व योजनांना आयुक्त स्तरावर तातडीने मान्यता देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्द.

Post a Comment
0 Comments