Type Here to Get Search Results !

इंदापूर -आगरदांडा रस्ता मृत्यूचा ठरतोय सापळा.?



तळा तारणे अवघड वळणावर पुन्हा अपघात; कंत्राटदार आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे निष्पापांचे किती बळी घेणार?

किशोर पितळे 

तळा तालुका प्रतिनिधी 

तळा  :-तळा शहराजवळील 'तारणेची डाग' (वळण) आता मृत्यूचा सापळा बनली आहे. गुरुवार, दिनांक २ जुलै २०२६ रोजी ६.३०वा दरम्यान याठिकाणी पुन्हा एक थरकाप उडवणारी घटनाघडली. एक अवाढव्य ट्रक या तीव्र उतरत्या वळणावर पलटी झाला असून, चालक ट्रकमध्येच अडकल्याची माहिती समोर आली आहे.सुदैवाने जीवीत हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली आहे.या धोकादायक वळणावर आणि तीव्र उतारावर वारंवार अपघात होत असून,आतापर्यंतअनेकप्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.वर्षभरात चार अपघात घडले घडले आहेत या अपघातांची नोंद पोलीस ठाण्यात केवळ 'अपघात' म्हणून केली जाते. परंतु, या अपघातांचे खरे कारण नव्याने बांधलेला रस्ता आणि त्यावरील धोकादायक वळण हेच आहे.इंदापूर ते आगरदांडा या महामार्गावर अशी अनेक भयानक वळणे आहेत.रस्ता तयार करताना संबंधित यंत्रणेने कोणताही तांत्रिक विचार केला नाही का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.महामार्गावरील वळणाचा कोन आणि त्याचा तिरकेपणा बँकिग किती असावा, याचा कोणताही अभ्यास न करता हा रस्ता बनवला गेल्याचे वारंवार होणाऱ्या अपघातांवरून स्पष्ट होत आहे. एकाच वळणावर जर वारंवार अपघात होत असतील, तर त्याला केवळ चालक जबाबदार नसून रस्ता बनवणारे कंत्राटदार आणि अभियंतेही तितकेच जबाबदार आहेत.असे जाणकार चालकांचे म्हणणे आहे याकडे वाहतूक पोलीस आणि प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. शेकडो नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर आणि नियंत्रण ठेवायला अपयशी ठरलेल्या संबंधितावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे. या संपूर्ण रस्त्याचे तातडीने 'तांत्रिक ऑडिट' (Technical Audit) करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच अपघात रोखण्यासाठी या ठिकाणी तातडीने तीव्र उतारापासून समान उंचींचे रब्रींग स्पीड ब्रेकर, रेडियम इंडिकेटर्स, गतिरोधक, धोक्याचे सिग्नल आणि फलक लावण्यात यावेत, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments