Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

शेतकऱ्यांच्या प्रलंबित धान चुकारे तातडीने खात्यात जमा करा ! आमदार राजूभाऊ कारेमोरे यांचा पाठपुरावा !



✍️भवन लिल्हारे भंडारा , गोंदिया जिल्हा प्रतिनिधी📱मो.नं.9373472847 / 8888519894


भंडारा : ( दिनांक १० जूलै २०२६) आज मा. आमदार राजूभाऊ माणिकराव कारेमोरे यांनी मुंबई येथे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. चे मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. अशोक करंजेकर यांची सदिच्छा भेट घेतली.


यावेळी रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये भंडारा जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या धानाच्या उर्वरित प्रलंबित चुकार्‍यांची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी व प्रश्न मांडून त्यावर तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.


यावेळी मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. अशोक करंजेकर यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून प्रलंबित धान चुकार्‍यांची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments