किशोर पितळे
तळा तालुका प्रतिनिधी
तळा : -"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" या तुकाराम महाराज यांच्या संत वचनाने प्रेरीतझालेले गौरव पोतदार व सहकारी मित्र राजेश करडे म्हसळा यांनी म्हसळा बायपास रस्त्यालगत वृक्षारोपण करून अनोखा उपक्रम हाती घेऊन सामाजिक बांधिलकी जाण राखून२५ झाडे लावून पालकत्व स्विकारलेआहे. म्हसळा बायपास जवळपास ५/६ कि.मी. लांबीचा असून या रस्त्यावर अजिबात मोठी झाडे नाहीत. त्यामुळे जमीनीतील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे या वृक्षारोपणामुळे जमीनीची धुप थांबून जमीनीतील ओलावा कायम टिकून राहून गुरंढोरांना प्राणी मात्रांना आधार व सावली मिळणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जावून हवेतील प्रदूषण व आँक्सिजन कमतरता कमी होण्यास मदत होईल क्षणभर विश्रांती घेऊन पादचारी किंवा प्रवाशांना प्राणवायू घेता येईल या झाडांचे संवर्धनाबरोबरसंगोपन करण्याचा संकल्प केला आहे. या अनोख्या वृक्षारोपण उपक्रमांनी समाजापुढे आदर्श घालूनदिलाआहे.त्यांच्या उपक्रमाचे धेय्य वेड्या समाज बांधवाचा युवापिढीने आदर्श घेऊन सामाजिक कार्याला वाहून घ्यावा असा संदेश दिला आहे.या अनोख्या उपक्रमाचे म्हसळा तालुक्यात कौतुक केले जात असून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment
0 Comments