Type Here to Get Search Results !

गुरु रविदास क्लब च्या वतीने चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन



खासदार व मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ 


✍️श्री. निलेश सोनवणे✍️ 

जळगांव जिल्हा प्रतिनिधी 


जळगाव -

जळगाव येथील गुरु रविदास क्लबच्या वतीने रविवार दि.12 जुलै रोजी सकाळी 10 वाजता केमिस्ट भवन, जिल्हा पेठ,  जळगाव येथे जिल्ह्यातील चर्मकार  समाजातील गुणवंत विद्यार्थी समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना.संजयभाऊ सावकारे यांच्या शुभहस्ते होणार असून याप्रसंगी ना.गिरीशभाऊ महाजन (जलसंपदा मंत्री , महाराष्ट्र राज्य) ना.गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा मंत्री,महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ) खा.स्मिताताई वाघ, आमदार राजू मामा भोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच  महापौर सौ.दीपमाला काळे,माजी महापौर श्री.विष्णूभाऊ भंगाळे, गटशिक्षणाधिकारी विजय पवार, नगरसेवक सौ.सुरेखा नितीन तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी उपशिक्षणाधिकारी मा.यशवंतराव ठोसरे उपस्थित असतील तर मा. निळकंठराव गायकवाड (माजी प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, जळगाव )हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच डॉ.राजेंद्र बाविस्कर (सेवानिवृत्त मुख्य अभियंता, दीपनगर) यांच्या विशेष उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.असे  गुरु रविदास क्लबचे अध्यक्ष डॉ. सुनील सूर्यवंशी, सचिव श्री.प्रदीप शेकोकार, प्रा. विठ्ठल  सावकारे, धीमंत पी.आर. आंबेडकर, श्री.संजय बाविस्कर, प्रा. स्मिता जयकर  यांनी कळविले. 


सदर कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातील चर्मकार समाजातील इयत्ता दहावी व बारावी तसेच पदवी, पदव्युत्तर, संशोधन,  विविध स्पर्धात्मक परीक्षा ,शिष्यवृत्ती परीक्षा , नीट, जेईई, सी ई टी व तत्सम परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्याची नोंदणी करण्यात आलेली होती.


या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.संजय सूर्यवंशी, डी . डी.ठोसरे, सौ.ज्योतीताई निंभोरे, श्री. गजानन दांडगे, प्रा. संदीप शेकोकार, प्रा. गणेश सूर्यवंशी डॉ.संजय भटकर, खंडुजी पवार, कैलास विसावे,  डॉ.सुनील निंभोरे,युवराज घोलाणे, कैलास सोनवणे, जगन्नाथ निंभोरे, दिलीप दांडगे, निवृत्ती सूर्यवंशी, संजय निंभोरे, प्रा.आत्माराम चिमकर , प्रा. माणिक बागले, गणेश राऊत, अरुण नेटके, सुनील वानखेडे, अशोक लोखंडे, अनिल वानखेडे,श्री.अशोक भारुडे,श्री.गणेशजी सुरळकर ,श्री.कैलास वाघ ,श्री.निवृत्ती सूर्यवंशी,प्रा.श्री संदीप शेकोकार,सौ.ज्योतीताई निंभोरे ,सौ.छाया जयकर

प्रा.श्री माणिक बागले,प्रा.ए.टी.चिमकर

डॉ.श्री संपतराव वानखेडे ,डॉ. सुरेंद्र सुरवाडे,डॉ. कैलास वाघ ,डॉ.गणेश भारुडे ,डॉ.सुनील तायडे ,डॉ.दिलीप जयकर,डॉ.प्रकाश सुरवाडे,श्री.खंडूजी पवार,श्री.केशव ठोसरे,श्री.डी.डी. ठोसरे,श्री.अरुण नेटके ,श्री.सोपान भवरे ,श्री.दिलीप दांडगे ,श्री.युवराज घोलाणे ,श्री.सुनील वानखेडे ,श्री.संदीप सूर्यवंशी ,श्री.सुरेश वाघमारे ,श्री.सुरेश घुले,श्री.गणेश दांडगे,श्री.गणेश राऊत,श्री.स्वप्निल ठोसरे,श्री.संतोष चंदनकर,श्री.शांताराम गवळे ,श्री.डी.ए.सोनवणे,श्री.रवींद्र देवरे,श्री.सुधाकर मोरे,श्री.संजय निंभोरे,श्री.अनिल वानखेडे,श्री.अशोक लोखंडे,श्री.दीपक अहिरे,श्री.प्रशांत निंभोरकर ,श्री.संजय भारुडे ,श्री.रामलाल ब्राह्मणे ,श्री.अमोल बाविस्कर , श्री.पुरुषोत्तम चिमणकर,श्री.नितीन दांडगे ,श्री निलेश गोरे ,श्री.अशोक भारुडे,श्री.मनोहर शेकोकार,श्री.दशरथ देशमाने श्री. मंगल रेघे,श्री.देविदास खैरनार,‌श्री.अशोराज तायडे

 आदी मंडळी परिश्रम घेत आहेत.

तरी जिल्ह्यातील चर्मकार बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थिती देण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments