Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

धानोरा येथे सरकारी तलावाचे अवैध मुरूम उत्खन जोमात महसुल अधिकारी कोमात !



माहिती देऊनही तलाठी-मंडळ अधिकारी झोपेत? १०० पेक्षा जास्त ट्रिपा झाल्याचा आरोप!


✍️भवन लिल्हारे प्रतिनिधी📱 मो.नं. 9373472847 / 8888519894


चंद्रपूर : (दिनांक १० जुलै २०२६ ) राजुरा तालुक्यातील धानोरा येथे सरकारी तलावातील मुरूमाचे अवैध उत्खनन जोमात  पण महसुल विभाग कोमात आहे. माहिती देऊन, व्हिडिओ-फोटो पाठवूनही तलाठी व मंडळ अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.


धानोरा येथील जिनिंगचे काम सुरू असताना जिनिंग मालकांनी 'मामा तलाव' या सरकारी तलावातील मुरूम अवैधरीत्या उपसून आपल्या जिनिंगच्या कामात वापरल्याची माहिती समोर आली. घटनास्थळी जाऊन पाहणी करून त्याचे व्हिडिओ व फोटो तलाठी व मंडळ अधिकारी यांना पाठवण्यात आले. फोनवरून संपर्कही साधला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.


आरोप आहे की, जंगल रस्त्यालगत स्वस्त रस्ता बनवून १०० पेक्षा जास्त ट्रिपा मुरूम नेला गेला आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात मुरूम उत्खनन बंद असताना हे उत्खनन सुरू आहे. सध्या देखील काम सुरूच असल्याची माहिती आहे.


या संदर्भात तहसीलदार साहेबांना माहिती दिली असता त्यांनी "कारवाई सुरू आहे" असे सांगितले. मात्र नेमकी काय कारवाई झाली याची माहिती मिळत नाही. तलाठी व मंडळ अधिकारी मात्र पूर्णपणे गप्प आहेत.


"माहिती देऊनही कारवाई का होत नाही? तलाठी व मंडळ अधिकारी झोपेत आहेत का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. चर्चेत आहे की साडगाळसाठी परवानगी दिली का? पण त्याचे कोणतेही कागदपत्र समोर आलेले नाही.


वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तातडीने चौकशी करून दंडात्मक कारवाई करावी. तसेच दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी धानोरा परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments