Type Here to Get Search Results !

भुसावळ नगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीचा धिक्कार हंडा मोर्चा; नगराध्यक्षांना गढूळ पाणी पिण्यास भाग पाडले




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


भुसावळ :- भुसावळ शहरातील पाणीटंचाई व दूषित पाण्याच्या प्रश्नावर आज (6 जुलै) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भुसावळ नगरपालिकेवर भव्य धिक्कार हंडा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो महिला व नागरिक सहभागी झाले होते.


मोर्चादरम्यान प्रशासन व नगराध्यक्षांना जाब विचारण्यात आला. नियमित व स्वच्छ पाणीपुरवठ्याची मागणी करत नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांना नागरिकांना मिळणारे गढूळ पाणी पिण्यास भाग पाडण्यात आले.


उपमुख्य अधिकारी, पाणीपुरवठा अभियंता व सत्ताधारी नगरसेवकांनी लवकरच नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच अमृत योजनेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.


मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार व पल्लवी गुरचळ यांनी केले. यावेळी जिल्हा संघटक बबन कांबळे,उपाध्यक्ष राहुल इंगळे,मीरा वानखेडे,संगीत खरे,रुपेश साळुंके,दीपक सोनवणे,ॲड. प्रवीण इंगळे,नवनीत गायकवाड,रोहित सोनवणे,विलास तायडे पदाधिकारी व शेकडो नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments