Type Here to Get Search Results !

नवजात बालक विक्री प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी!

 



मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चंद्रपूर :- चंद्रपूरमध्ये उघडकीस आलेल्या कथित नवजात बालक विक्री प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला महानगर आघाडीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देत संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी, सूत्रधार, दलाल आणि संबंधितांवर कोणताही राजकीय, सामाजिक किंवा अन्य प्रभाव न पाहता निष्पक्ष व कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच आर्थिक व्यवहार, कॉल रेकॉर्ड आणि डिजिटल पुराव्यांची सखोल चौकशी करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.


"गुन्हेगाराला कोणताही पक्ष, जात किंवा धर्म नसतो," अशी भूमिका मांडत भविष्यात अशा अमानुष घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सर्वंकष तपासाची आवश्यकता महिला आघाडीने व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments