त्रिशा राऊत नागपूर जिल्हा क्राईम रिपोर्टर मो 9096817953
उमरेड .उद्घाटनाच्या वेळी
मोठमोठे दावे, श्रेयासाठी राजकीय चढाओढ आणि जनतेसमोर विकासाची भाषा... पण प्रत्यक्षात आठ महिन्यांतच ट्रॅफिक सिग्नलचा खांब महामार्गावर आडवा झाल्याने या विकासाचा बुरखा गुरूवारी फाटला. उमरेड बायपास चौकातील चार खांबांपैकी दक्षिणेकडील खांब हलक्या वादळातच कोसळल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रशचिन्ह निर्माण झाले आहे. सुदैवाने पाऊस आणि वान्यामुळे वाहतूक कमी होती. अन्यथा आज मोठी जीवितहानी झालरती.
उमरेड बायपास चौक हा अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखला जातो. वाढत्या वाहतुकीमुळे येथे ट्रैफिक सिग्नल बसविण्याची मागणी अनेक वर्षापासून सुरू होती. अखेर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने मंजुरी देत सिग्नल उभारला. २ नोल्हेंबर २०२५ रोजी भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांच्या हस्ते त्याचे मोठ्या गाजावाजात उद्घाटन झाले. त्यावेळी सिग्नलसाठी मंजुरी मिळविण्यापासून निधी आणेपर्यंत आपण प्रचंड मेहनत घेतल्याचा दावाकरण्यात आला होतामात्र अवघ्या आठ महिन्यांतच वास्तव समोर आले. गुरुवारी सायंकाळी आलेल्या हलक्या वादळाचा मारही हा सिग्नल सहन करू शकला नाही. चारपैकी एक खांब थेट महामार्गावर आडवा पडला. ही घटना केवळ लोखंडी खांब कोसळण्याची नाही, तर सार्बजनिक कामांतील निकृष्ट दर्जा आणि संभावय भ्रष्टाचाराचे प्रतीक असल्याची चर्चा शहरभर सुरू झाली आहे.नागरिकांनी कामात निकृष्ट साहित्य वापरल्याचा आरोप केला. लाखो रुपयांचे काम जर एका हलक्या वादळात कोसळत असेल, तर. या कामाची गुणवात्ता तपासली कोणी? काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देणारे अधिकारी कोण? कंत्राटदारावर कोणाची मेहेरनजर होती? असे प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेतसिग्नल उभारण्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय व्यासपीठावर झुंबड उडाली होती. आता तोच सिग्नल कोसळल्यानंतर मात्र बहुबोल्या नेत्यांची वाचा बसल्याची टीका नागरिक करत आहेत. नेत्यांना जनतेच्या सुरक्षिततेची चिंता होती की कामातील कमिशनची? असा संतपत सवाल शहरभर ऐकायला मिळत आहे.घटनेची माहिती मिळताच वाहतूक विभागांचे पोलीस कर्मचारी धावून आले. त्यांनी वाहतूक सुरुळीत करत परिसर सुरक्षित केला.विद्युत विभागालाही पाचारण करून संभाव्य धोका टाळण्यात आला. पोलिसांनी तत्परता दाखवली; मात्र संबंधित विभाग आणि कंत्राटदराच्या निष्काळजीपणावर पडदा टाकता येणार नाहीआता या प्रकरणाची केवळ औपचारिक चौकशी नको, तर स्वतंत्र तंत्रिक तपासणी करून निकृष्ट काम करणान्या कंत्राटदारासह कामाला मंजुरी देणान्या अधिकान्यांची चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.सिग्लच्या उद्घाटनाचे श्रेय घेणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांनीही आता दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा उमरेडकर व्यक करत आहेत.
अवघ्या आठ महिन्यांत कोसळलेल्या सिम्मल मुळे, काम निकृष्ट आणि कमिशनखोरी मोठी झाल्याच्या चर्चा शहरभर सुरू.

Post a Comment
0 Comments