त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953
नागपुर.रस्ता विसरल्याने कारचालकाने दुचाकीवरील दोघांना बुटीबोरीकडे जाणारा मार्ग विचारला. त्या दोघांना मार्ग तर सांगितला, मात्र, काही वेळात पाठलाग करून ती कार अडवली आणि चाकू दाखवून कारचालकाच्या गळ्यातील सोन्याची चेन व पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेत पळून गेले. या दागिन्यांची किंमत १ लाख २६ हजार रुपये असून, ही घटना बुटीबोरी (ता. नागपूर ग्रामीण) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-फुकेश्वर-बुटीबोरी मार्गावर ५ जून रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणातील आरोपी महिनाभरापासून पोलिसांच्या हाती लागले नाही.
सुशांत चंद्रकांत हजारे, रा. नागपूर हे पत्नी व मुलीला घेऊन त्यांच्या कारने ५ जूनच्या सायंकाळी नागपूर शहरातील हुडकेश्वर येथून फुकेश्वर मार्गे बुटीबोरीकडे जायला निघाले. मध्येच रोड विसरल्यागत झाल्याने सुशांत यांनी त्याच रोडने जाणाऱ्या दुचाकीस्वार दोघांना बुटीबोरीला जाणारा मार्ग विचारला. दोघांनीही हाच रोड जात असल्याचे सांगताच सुशांत पुढे निघाले. ते काही दर जाताच त्याच
मुलीने केले चित्रीकरण
सुशांत यांची मुलगी कारमध्ये
एकटीच मागच्या सीटवर बसली होती. तिने प्रसंगावधान बाळगून लुटमारीच्या या घटनेचे तिच्या मोबाइल फोनमध्ये चित्रीकरण केले. या क्लिपमध्ये आरोपी चाकू दाखवून धमकावताना दिसून असून, त्यांचे चेहरे देखील दिसत आहे. त्यामुळे ही क्लिप पोलिस तपासाचा महत्त्वाचा धागा ठरू शकते.
दुचाकीस्वारांनी पाठलाग करून कार अडविली. चाकू दाखवून सुशांत यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेत दुचाकीस्वार दोघेही हुडकेश्वर (नागपूर) च्या दिशेने पळून गेले. सुशांत यांनी काही वेळाने त्यांच्या वडद येथे राहणाऱ्या व्यक्तीला फोन करून घटनाक्रम सांगितला आणि नंतर बुटीबोरी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. दोघांनी लटलेल्या दागिन्यांची
नागरिकांनी केला पाठलाग
सुशांत यांच्याकडून माहिती मिळताच
वडद येथील व्यक्त्तीने हा प्रकार गावातील नागरिकांना सांगितला. लुटारूंना पकडण्यासाठी वडद येथील काही नागरिक रोडवर उभे होते. रोडवर जमाव दिसताच आरोपींनी दुचाकी माघारी वळवून दुसऱ्या मार्गाने हुडकेश्वर, नागपूरकडे पळ काढला. नागरिकांनी त्या दोघांचा पाठलाग केला. मात्र, त्यांना पकडण्यात यश आले नाही.
तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह
सुशांत यांनी 'ती' व्हिडीओ क्लिप पोलिसांना दिली. त्या क्लिपमध्ये लुटारूंचे चेहरे व हालचाली स्पष्ट दिसून येतात. या घटनेला एक महिना पूर्ण झाला असून, पोलिसांना आरोपींचा माग घेण्यात यश आले नाही. त्यामुळे या घटनेचा तपास व त्याच्या गतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकूण किंमत १ लाख २६ हजार रुपये असल्याचे पोलिस दप्तरी नोंद असली तरी त्या दागिन्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत यापेक्षा तिप्पट आहे. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी दोन लुटारूंविरुद्ध गन्हा नोंदवन तपास सरू केला आहे.

Post a Comment
0 Comments