Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ शालेय साहित्याचे वाटप


त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953

भिवापूर : शिवसेना (शिंदे गट) युवा सेना भिवापूर तालुका अध्यक्ष सुमित भाऊ आळे यांच्या पुढाकाराने भिवापूर तालुक्यातील मालेवाडा सर्कल अंतर्गत शिवापूर येथे विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ छत्री, नोटबुक, टिफिन बॉक्स तसेच विविध शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमाच्या प्रसंगी रुपराव गिरडे (तालुका प्रमुख, भिवापूर), रवि भाऊ लक्ष्मण भाऊ प्रकाश गेडाम, आत्माराम आळे, भारत आळे, अमित कुंभरे, दिवाकर चौहान तसेच गावातील अनेक नागरिक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत, "आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत. शिक्षणाच्या प्रवासात कुठेही मदतीची गरज भासल्यास निःसंकोचपणे सांगा. तुमचा आनंद आणि यश हीच आमच्या सामाजिक कार्याची खरी पावती आहे," असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला.

या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments