Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

प्रदीप पंढरीनाथ जोशी यांचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सत्कार


        


मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8108166961/9860020016


 मुंबई :- गुरुनाथ तिरपणकर)आयुर्विद्या प्रसारक मंडळ संचालित आयुर्वेद महाविद्यालय शिव मुंबई तर्फे  शनिवार दिनांक 1/8/2026 रोजी आयोजित पंचकर्म कार्यशाळा निमित्त मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले व संस्थेत 50 वर्ष सलग ,अखंडित ,अविरत,निस्वार्थ व निष्ठापूर्वक सेवा दिलेले श्री. प्रदीप पंढरीनाथ जोशी यांचा प्रदीर्घ सेवेचा  व सौ प्रिती जोशी यांनी त्याना खंबीर साथ दिल्याबद्दल आणि त्यांच्या  सेवेचा सत्कार, संस्थेचे सरकार्यवाह माननीय डॉ. आशानंद सावंत सर  यांच्या शुभहस्ते शाल ,श्रीफळ ,व जीवनगौरव पुरस्कार सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे  ,विश्वस्त व प्राध्यापक डॉ. विश्वजित पाताडे सर ,,नियामक मंडळ सदस्य डॉ. राजन पाटणकर सर  प्राचार्य. डॉ. रविदास मोरे सर ,माजी प्राचार्य डॉ. कामत सर व डॉ. सातपुते सर  उपप्राचार्य डॉ. पाथरीकर मॅडम व डॉ. शिला कोहाड , डॉ. पंकज ताथेड सर व सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी ,आंतरवाशी वैद्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते व डॉ. हेमंत पराडकर सर यांनी  श्री. प्रदीप पंढरीनाथ जोशी यांच्या ५०वर्षीय  सेवेचा ,सामाजिक ,संघटनात्मक ,व पत्रकारिता कार्याचा परिचय करून दिला व त्यानंतर श्री. प्रदीप जोशी यांनी या सत्कार विषयी आपले मनोगत व्यक्त केले व वैद्य पंकज ताथेड सर यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments