मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
ब्रम्हपुरी :- सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे की ब्रम्हपूरी मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी आणि शेतमजुरांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेसच्या वतीने 'जन आक्रोश महामोर्चा' काढून कष्टकरी शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगणा ते तहसील कार्यालय दरम्यान काढण्यात आलेल्या या महामोर्चाचे नेतृत्व करत सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काचा आवाज प्रशासनामार्फत असंवेदनशील बनलेल्या सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. या मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी होऊन शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी आणि शेतमजुरांनी व्यक्त केलेला रोष सरकारला त्यांच्या न्याय व हक्काच्या मागण्या मान्य करायला भाग पाडणारा आहे.
या मोर्चाद्वारे धानाचा बोनस, कर्जमुक्ती, स्मार्ट मीटर योजना रद्द करणे, गोसेखुर्द प्रकल्पाचे बारमाही सिंचन, ओबीसी जातिनिहाय जनगणना, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे थकीत मानधन, समृद्धी महामार्गग्रस्त शेतकऱ्यांना न्याय, महागाई नियंत्रण, रोजगारनिर्मिती, हमीभाव आणि महिलांच्या सुरक्षेसह विविध जनहिताच्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
या जनआक्रोश मोर्चात युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, काँग्रेस शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, प्रभाकर सेलोकर, राजेश कांबळे, प्रमोद चिमुरकर, नगराध्यक्ष योगेश मिसार, नगरपरिषद. उपाध्यक्ष डॉ. नितीन उराडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे, थानेश्वर कायरकर, सोनू नाकतोडे यांच्यासह हजारो शेतकरी, महिला कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post a Comment
0 Comments