Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

स्वातंत्र्यदिनानिमित्त युवा प्रतिष्ठान रायगडचा शैक्षणिक उपक्रम उत्साहात संपन्न




✍️ दिलीप करकरे ✍️

माणगाव, रायगड 

7208708456

श्रीवर्धन:-  कारिवणे (ता. श्रीवर्धन, जि. रायगड) : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने युवा प्रतिष्ठान रायगड (स्थापना – २०२२) यांच्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळा, कारिवणे येथे शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या युवा प्रतिष्ठानच्या या उपक्रमास विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन श्री. सतीश चोरगे (विभाग संघटक प्रमुख, युवा प्रतिष्ठान रायगड) यांनी केले. त्यांना श्री. ऋषीनाथ पाड्याळ (सहकारी सदस्य) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच संस्थेचे सर्व उपाध्यक्ष, मुंबई विभागातील पदाधिकारी, श्री. बाबुराव चोरगे व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.

उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व, शिक्षणाचे मूल्य आणि सामाजिक बांधिलकी यांविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिक्षण, समाजसेवा आणि राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षकवृंद, ग्रामस्थ तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे युवा प्रतिष्ठान रायगडच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments