मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे स्वच्छता जनजागृती उपक्रम मंगळवार (ता.२५) रोजी 'लिटल मिलेनियम स्कूल' श्री नगर येथे आयोजित केला. पीआययू (PIU) टीमने या जनजागृती सत्रादरम्यान, विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबत माहिती दिली.
तसेच, विद्यार्थ्यांना कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या '४-बिन' पद्धतीबद्दल माहिती देण्यात आली आणि कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून तो कचरा संकलन करणाऱ्या अधिकृत वाहनातच टाकण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
यावेळी 'My Pocket, My Bin' या संकल्पनेबाबतही जनजागृती करण्यात आली; सार्वजनिक ठिकाणी कचरा न फेकता, योग्य कचराकुंडी मिळेपर्यंत कचरा स्वतःजवळच ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, कचऱ्याचे वर्गीकरण, आरोग्यदायी सवयी आणि कचऱ्याची जबाबदारीने विल्हेवाट लावण्याची वृत्ती रुजवणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

Post a Comment
0 Comments