विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931
एटापल्ली, : - शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख मा. राकेश भाऊ बेलसरे तसेच अहेरी विधानसभा प्रमुख मा. संदीप भाऊ कोरेत यांच्या मार्गदर्शनाखाली "शाळा भेट"* या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमादरम्यान एटापल्ली तालुक्यातील *कृष्णार तसेच गुरुपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत जवेली, पंदेवाही स. व गुरुपल्ली* येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देण्यात आली.
यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधून शैक्षणिक परिस्थिती, विद्यार्थ्यांच्या अडचणी तसेच शाळेतील विविध सुविधांचा आढावा घेण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचा शिक्षणातील उत्साह वाढावा, या उद्देशाने शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना *शालेय साहित्याचे वाटप* करण्यात आले.
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आवश्यक सुविधा मिळाव्यात, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
यावेळी उपस्थित मान्यवर:
अक्षय पुंगाटी, नगरसेवक नामदेव हिचामी (न. पं. एटापल्ली), कैलास उसेंडी सरपंच (ग्रा. पं. गुरुपल्ली), बाळू भाऊ आत्राम उपसरपंच (ग्रा. पं. गुरुपल्ली), नत्तू दुर्वा, प्रशांत तलांडे, रिषभ दुर्गे, सौ. राजश्री ताई जांभूळकर तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments