विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931
एटापल्ली, दि. २४ : ऑल इंडिया यूथ फेडरेशन (AIYF) चे राष्ट्रीय सचिव कॉ. सुखजिंदर महेसरी हे एटापल्ली व भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत AIYFचे छत्तीसगड राज्य अध्यक्ष कॉ. विक्रांत शर्मा आणि महाराष्ट्र राज्य सचिव कॉ. सागर दुर्योधन हे उपस्थित होते.
AIYF ही कम्युनिस्ट विचारांची युवक संघटना असून युवक तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याचे काम संघटनेमार्फत केले जाते. AIYFचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या भेटीसाठी तसेच संघटनात्मक चर्चेसाठी हे पदाधिकारी एटापल्ली येथे आले होते.
या दौऱ्यादरम्यान पेंदुलवाही येथे जनतेशी संवाद साधण्यात आला. यावेळी पेंदुलवाहीसह परिसरातील मेढरी,कोसा आलेंगा,व ३ ते ४ गावांतील नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या गावातील विविध समस्या, मूलभूत सुविधा तसेच दैनंदिन अडचणी कॉ. सुखजिंदर महेसरी, कॉ. विक्रांत शर्मा आणि कॉ. सागर दुर्योधन यांच्यासमोर मांडल्या. पदाधिकाऱ्यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली. स्थानिक जनतेच्या प्रश्नांना संघटितपणे पुढे नेण्यासाठी तसेच युवकांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याबाबत संघटनात्मक चर्चा करण्यात आली.
एटापल्ली तालुक्यातील दौऱ्यानंतर पुढील कार्यक्रम भामरागड तालुक्यात नियोजित होता. मात्र परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भामरागडचा पुढील दौरा रद्द करण्यात आला. प्रतिकूल हवामानामुळे दौरा रद्द झाला असला तरी पेंदुलवाही येथे झालेल्या जनसंवादातून स्थानिक नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेता आल्या.
या संपूर्ण दौऱ्याचे नियोजन AISFचे जिल्हा संयोजक कॉ. सुरज जक्कुलवार आणि भाकपाचे शहर सचिव कॉ. तेजस गुज्जलवार यांनी सांभाळले.
या दौऱ्यामुळे एटापल्ली परिसरातील जणिराम हिचामी, बंडू हिचामी गाव पाटील,रामा हलामी, परशुराम नैताम, मधुकर पोटावी सहित अनेक युवक, विद्यार्थी आणि ग्रामीण व आदिवासी जनतेच्या प्रश्नांवर संघटनात्मक पातळीवर चर्चा करण्याची संधी मिळाली. AIYFच्या माध्यमातून युवक व जनतेच्या प्रश्नांना संघटितपणे पुढे नेण्यासाठी आगामी काळातही प्रयत्न करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

Post a Comment
0 Comments