Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

उमरेड-भिवापूर मार्गावर अपघाताची मलिका सुरूच अपघाता मध्ये भावा च मृत्य तर बहीण गंभीर जखमी.



त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953


उमरेड. उमरेड येथील एक धक्का दायक घटना समोर येत आहे 

उमरेड-भिवापूर मार्ग ठरतोय जीवघेणा; खड्डे, जड वाहतूक अन् अपघातांची मालिका!

रेतीच्या वाहनांसह अवजड वाहतुकीचा मोठा ताण; दुपदरी मार्ग चारपदरी करण्याची गरज, तरी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का? उमरेड-भिवापूर मार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असूनही कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.


उमरेड-भिवापूर मार्ग अनेक वर्षांपूर्वी दुपदरी करण्यात आला. मात्र, आता या मार्गावरील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रेती वाहून नेणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असून अवजड वाहनांची वर्दळही वाढली आहे. त्यामुळे आधीच दुपदरी असलेल्या मार्गावर वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला आहे.


त्यातच रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे चुकविताना दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांना धोका निर्माण होतो. समोरून येणारी वाहने, अवजड वाहतूक आणि अरुंद रस्ता यामुळे अपघाताची शक्यता अधिक वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


आज सकाळी भिवापूर वायपॉईंटजवळ रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीला ट्रॅव्हल्सने धडक दिली. या अपघातात वेदांशु वराडे या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, तर त्याची बहीण प्रिन्सी वराडे गंभीर जखमी झाली. जखमी प्रिन्सीला उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले.


या मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून कुणाचे प्राण गेले, तर कुणाचे हात-पाय निकामी झाले. अनेक कुटुंबांवर अपघातांमुळे कायमचे दुःख कोसळले आहे. त्यामुळे हा मार्ग आता नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.


वाढती वाहतूक, रेती वाहतूक आणि अवजड वाहनांची वर्दळ लक्षात घेता उमरेड-भिवापूर मार्गाचे चारपदरीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजवून सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.


लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींची निवड केली जाते. मात्र, आमदार संजय मेश्राम आणि खासदार श्यामकुमार बर्वे यांचे या गंभीर प्रश्नाकडे पुरेसे लक्ष आहे का? असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.


रस्त्याची दुरवस्था आणि वाढत्या जड वाहतुकीकडे प्रशासन किती काळ दुर्लक्ष करणार? आणखी किती अपघात आणि किती बळी गेल्यानंतर उमरेड-भिवापूर मार्गाच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळणार? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात आहे.

Post a Comment

0 Comments