Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवल्याबद्दल देव गोंगले या गुणवंत विद्यार्थ्याचा भगवंतराव आश्रम शाळेत भव्य सत्कार




मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809


अहेरी :- राजाराम (खां) मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या वतीने २५ एप्रिल २०२६ रोजी राणी दुर्गावती कन्या शाळेत घेण्यात आलेल्या प्रतिष्ठित 'महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत' भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा, राजाराम (खां) येथील इयत्ता ८ वी चा विद्यार्थी देव मधुकर गोंगले याने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर घवघवीत यश संपादन केले. या ऐतिहासिक यशाबद्दल आज, दिनांक २२ सप्टेंबर रोजी भगवंतराव आश्रम शाळेच्या प्रांगणात देव गोंगले याचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पाडला.

​एका सामान्य शेतकरी कुटुंबातील असलेल्या देवचे वडील मधुकर गोंगले हे राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष असून, आई लताबाई मधुकर गोंगले गृहिणी आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देवने मिळवलेल्या या यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

​आज आयोजित सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक टी. सी. ओड्नलवार सर होते. प्रमुख उपस्थितीत देवचे आवडते गणित विषय शिक्षक सुदर्शन वासाडे सर  यांच्यासह प्रवीण गोंडाने सर,एस. एस मेश्राम, जी. एस. कापटे, एस. आर. पठाण सर, व्ही. डी, बत्तूलवार सर, एन. एम. मडावी सर, अधीक्षक पी. बी, गेडाम, अधिक्षिका सरोजना आत्राम, मॅडम एस. डब्लू, पठाण,अनिल आत्राम सर. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन देवचा जाहीर गौरव करण्यात आला.

Post a Comment

0 Comments