त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो.9096817953
शिलवंत बहुुउद्देशिय विकास संस्था जाख द्वारा संचालित उज्वल व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र साकोलीच्या संचालिका सन्माननीय उषा शिलवंत घोडेस्वार यांना यांच्या साहित्यिक कार्यासाठी राज्यस्तरीय प्रबोधिनी कविरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रबोधिनी प्रेरणा फाऊंडेशन चंद्रपूर शाखा वर्धा तर्फे आयोजित "राज्यस्तरीय कविसंमेलन व कविरत्न पुरस्कार" दिनांक 6/09/2026 रोजी श्री संत गाडगे बाबा स्मारक व सभागृह वर्धा येथे आयोजित करण्यात आले होते. साहित्यिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी व लेखन करण्यासाठी सौ. उषा शिलवंत घोडेस्वार यांना संमेलनाध्यक्ष मा. राजेंद्र मुंडे सर, श्री. भालचंद्र डंभे, ॲड. मृणालिनी रागीट, अर्चनाताई भोमले, विद्या ताई राईकवार, विठ्ठल लोणकर, सुरेशराव गणराज, उषाताई राऊत, मंगला डहाके, रंजना आटे व प्रबोधिनी प्रेरणा फाऊंडेशनचे संचालक माननीय प्रशांत रामटेके सर या सर्वांच्या उपस्थितीत शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सौ. उषा शिलवंत घोडेस्वार यांच्या धारदार, सकारात्मक लेखनामुळे, व सामाजिक जनजागृतीच्या कार्याला नवी प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या लेखणीतून दररोज एक विचार... मनाला नवा दृष्टिकोन असा विचार ठेवून त्यांची लेखणी अजूनच बहरत आहे.
प्रबोधिनी प्रेरणा फाऊंडेशनचे अध्यक्ष माननीय प्रशांत रामटेके सर व त्यांची आयोजक समिती यांच्या नेतृत्वाखाली कविसंमेलन व राज्यस्तरीय प्रबोधिनी कविरत्न पुरस्कार सोहळा अतिशय सुंदररित्या पार पडला.
या संमेलनाचे सूत्रसंचालन माननीय कवी रवी ताकसांडे सर व कवयित्री हर्ष भुरे यांनी केले तसेच सर्व उपस्थितांचे आभार प्रदर्शन माननीय विठ्ठल लोणकर सर यांनी केली. सर्व वाचक व लेखक यांच्या उपस्थितत हा सोहळा अतिशय सुरळीतपणे पार पडला.

Post a Comment
0 Comments