मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
मो. 8208166961
अमरावती: -
लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांच्यावर अमरावती जिल्ह्याचे निष्क्रिय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या बेताल व प्रक्षोभक विधानाचा अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र शब्दांत धिक्कार करण्यात आला. आज संतप्त युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले आणि जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
स्वतःच्या निष्क्रियतेवर पांघरूण घालण्यासाठी आणि वरिष्ठ नेत्यांची खुशामत करण्यासाठीच बावनकुळे यांनी राहुलजी गांधींवर बिनबुडाचे आरोप केले आहेत.
जिल्ह्यात शेतकरी अडचणीत असताना, सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम नसताना आणि मूलभूत सुविधांचा बट्ट्याबोळ उडालेला असताना पालकमंत्र्यांना जनतेच्या प्रश्नांचा पूर्ण विसर पडला आहे.
बावनकुळे यांनी काल झालेल्या बैठकीत स्वतः मान्य केले की अधिकारी यांच्यावर त्यांचे अंकुश नाही.
या आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले, कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगळे, प्रदेश महासचिव निलेश गुहे, NSUI प्रदेश उपाध्यक्ष संकेत कुलट, जिल्हा उपाध्यक्ष नितिन काळे, अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, बडनेरा अध्यक्ष आशिष यादव, सत्यजीत विधळे, संदीप मुंडे, लोकेश केणे, सुनील मानकर, प्रीतम कुकडे, सुरज खैरे, मयूर गुनखडे, हर्षल यावलीकर, हर्षल साखरकर,पवन ढोबले, चेतन इतनारे,आदित्य भिड़कर, ओम उंबरकर, विक्की तायडे, मनोज केदार, राजू तंबाखे, राम बोबडे, वैभव भोरे, योगेश घोडेस्वार, वेदांत साखरे, ओम उमळेकर, ओम खराटे, लकी फुले यांच्यासह अमरावती जिल्हा युवक काँग्रेस व NSUI चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments