Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

गावकऱ्यांची समस्या CPIने सोडवली; रेखाभटाळमध्ये Airtel नेटवर्क सुरू




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


एटापल्ली : ग्रामपंचायत गर्देवाडा अंतर्गत रेखाभटाळ गावात गेल्या काही दिवसांपासून Airtel मोबाईल नेटवर्क सेवा बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, UPI व बँकिंग व्यवहार, ऑनलाइन शासकीय कामे तसेच नातेवाईक आणि आपत्कालीन सेवांशी संपर्क साधण्यात अडथळे निर्माण झाले होते.


या समस्येमुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी CPIकडे मदतीची मागणी केली. गावकऱ्यांची समस्या गांभीर्याने घेत CPIने संबंधित यंत्रणा व प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा करून Airtel नेटवर्क सेवा सुरू करण्याची मागणी केली.


याबाबत CPIचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “रेखाभटाळमधील नागरिकांनी नेटवर्क बंद असल्याची समस्या आमच्याकडे मांडल्यानंतर आम्ही तातडीने संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा केला. नागरिकांना आवश्यक असलेली मोबाईल नेटवर्कसारखी मूलभूत सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. आमच्या पाठपुराव्यानंतर नेटवर्क सेवा सुरू झाल्याने गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, भविष्यात पुन्हा नेटवर्क बंद पडू नये यासाठी टॉवरला कायमस्वरूपी वीज कनेक्शन किंवा सौरऊर्जा व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.”


CPIच्या पाठपुराव्यानंतर रेखाभटाळ गावातील Airtel नेटवर्क सेवा पुन्हा सुरू झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नेटवर्क सेवा सातत्याने सुरू राहण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी कॉ. सचिन मोतकुरवार जिल्हा सहसचिव आणि कॉ. सुरज जककुलवार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments