Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

महिलांनी स्वतःच्या पायावर उभ राहण हीच खरी सक्षमतेची ओळख : सौ.रोहिणी शिंदे



बदलापूर प्रतिनिधी 

गुरुनाथ तिरपणकर


बदलापूर :- जनजागृती सेवा संस्थेच्या ग्रुप सदस्यांनी कुळगाव बदलापूर नगरपरिषद आणि ॐग्रामण्ये इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल एक्सलेन्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महिला शिबिराला भेट देऊन माहिती जाणून घेतली.

महिला नेहमीच कुटुंबासाठी पुढाकार घेवून झटत असतात, पुरुषांची मक्तेदारी असलेली सगळी क्षेत्रे महिलांनी काबीज केली आहेत. पुरुषांपेक्षा महिला जास्त कार्यक्षम आहेत. पुरुषांच्या तुलनेत जास्त काम करतात आणि त्यांचा मान सन्मान त्यांना मिळाला पाहिजे असे मत जनजागृती सेवा संस्थेचे जेष्ठ सल्लागार आणि समता साहित्य अकादमीचे महाराष्ट्र अध्यक्ष श्रीयुत दिलीप नारकर यांनी केले.

श्रीयुत सुहास सावंत यांनी महिलांना डिजिटल माध्यमे आणि सोशल एप्सचा वापर करून आपला व्यवसाय वेगळ्या ऊंचीवर घेवून जाण्याबाबत मार्गदर्शन केले.मनात आणल तर आपण कोणतीही गोष्ट करु शकता!याच जिवंत उदाहरण म्हणजे प्रशिक्षणासाठी वेळात वेळ काढून उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या या सर्व महिला.आपल्या इच्छेला दिशा देऊन,नवनव्या गोष्टी आणि व्यवसायातील गमके समजून घेवून, हें प्रशिक्षण घेवून पुढे आपण आपल्या व्यवसायाची प्रगती कशी करू शकतो याचा विचार करणे आणि आपल्या इच्छेला दिशा देऊन नवीन गोष्ट शिकण्याची तयारी ठेवून आणि हे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण पुढे काय करु शकतो?याचा विचार करण हीच खरी प्रगतीतीची सुरुवात आहे.असे मत सोहम इको सोल्युशनच्या संस्थापिका सौ. रोहिणी शिंदे यांनी मांडले.  

याप्रसंगी शिवण कामातील विविध प्रकार यासंदर्भात शिक्षिका राणी सचिन भंडारे, मिनाक्षी शदर वाघमारे, ज्योती सागवेकर यांनी बेसिक माहिती सांगितली.तसेच यावेळी जनजागृती ग्रुप सदस्या(संचालिका-सोहम इको सोल्युशन, घनकचरा व्यवस्थापन समुपदेशिका)रोहिणी प्रशांत शिंदे मॅडम यांनी महिलांना शिवणकाम त्यातील बारकावे अशी विविधांगी सविस्तर उपयुक्त माहिती त्यांनी महिलांना दिली.त्याच प्रमाणे जनजागृती सदस्य दिलीप नारकर(अध्यक्ष-समता साहित्य अकादमी महाराष्ट्र), जनजागृती ग्रुप सदस्य सुहास सावंत(अध्यक्ष-उमेद बहुउद्देशीय सामाजिक संस्था), जनजागृती ग्रुप सदस्य राजेंद्र नरसाळे(सचिव-सिटीझन वेल्फेअर असोसिएशन, बदलापूर) यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी केले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ॐग्रामण्ये इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल एक्सलेन्सचे डायरेक्टर शिवराम चव्हाण सर, प्रकल्प अधिकारी प्रविण कुंभार सर यांचे मार्गदर्शन लाभले.विशेष म्हणजे कुळगाव बदलापूर नगरपरिषद आयोजित महिला बालकल्याण योजनेअंतर्गत मोफत महिला प्रशिक्षण शिबीरासाठी नगरसेवक किरण भोईर यांच्या विशेष मार्गदर्शन व सहकार्याने हे मोफत महिला प्रशिक्षण शिबीर आनंद दिघे भाजी मार्केट,सहकार हाॅटेलच्या मागे, बदलापूर पश्चिम येथे सुरु आहे.या मोफत महिला प्रशिक्षणासाठी महिला व बाल कल्याण अधीक्षक मा.श्रीकांत निकुळे याचे बहुमोल सहकार्य लाभत आहे.

Post a Comment

0 Comments