मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
मो. 8208166961
चंद्रपूर, दि. २१ : राष्ट्रीय काँग्रेस कमिटी, चंद्रपूर शहर (अनुसूचित जाती विभाग) च्या जिल्हाध्यक्ष सौ. सुनिता राजू गोवर्धन यांनी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हा कारागृह चंद्रपूर येथे आयोजित या कार्यक्रमात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवघ्या २५ व्या वर्षी जंगोम सेना उभारून इंग्रज फौजांविरोधात सशस्त्र लढा देणाऱ्या क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना २१ ऑक्टोबर १८५८ रोजी चांदा (चंद्रपूर) येथील कारागृहाच्या आवारात फाशी देण्यात आली होती. त्यामुळे २१ ऑक्टोबर हा दिवस त्यांचा बलिदान दिन म्हणून ओळखला जातो.
यावेळी बोलताना सौ. गोवर्धन म्हणाल्या, "क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसतहसत प्राणांची आहुती दिली. त्यांचा त्याग आणि धैर्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. वंचित व उपेक्षित समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या क्रांतिवीराचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प काँग्रेस पक्षाने केला आहे."
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी "क्रांतिवीर बाबुराव शेडमाके अमर रहे" अशा घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित समाज बांधव व पदाधिकाऱ्यांची यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments