Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

विनोद चांदेकर यांच्या सामाजिक दायित्वातून टोमटा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न ऐरणीवर

 



सुस्त पडलेले विरोधकही झाले जागे


गोंडपिपरी / राजेंद्र झाडे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो 9518368177


शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रांत सातत्याने उल्लेखनीय योगदान देणारे खंदे समाजसेवक विनोद चांदेकर यांच्या धडक पुढाकारामुळे वर्षानुवर्षे ठप्प पडलेला टोमटा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न अखेर जगासमोर आला आहे. कोणत्याही राजकीय किंवा संवैधानिक पदावर नसताना केवळ सामाजिक दायित्वाच्या भावनेतून चांदेकर यांनी हा प्रश्न उचलून धरल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.


 *गोरगरिबांच्या सुख-दुःखात धावून जाणारे नेतृत्व* 

विनोद चांदेकर हे आपल्या अंगभूत स्वभावामुळे भागात परिचित आहेत. समाजसेवेला सर्वोच्च प्राथमिकता देत गोरगरिबांच्या सुख-दुःखात तातडीने धावून जाणे आणि त्यांच्या अडचणी सोडवणे हा त्यांचा नेहमीचा बाणा राहिला आहे. शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेत त्यांनी केलेले काम सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरले आहे.टोमटा उपसा सिंचन योजना वर्षानुवर्षे बंद अवस्थेत धूळ खात पडली होती. हा गंभीर प्रश्न कित्येकांच्या डोळ्यांसमोर होता, मात्र आजवर एकाही मोठ्या नेत्याला किंवा लोकप्रतिनिधीला हा प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे धाडस झाले नाही. जे काम भल्याभल्यांना जमले नाही, ते विनोद चांदेकर यांनी सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी समोर आणले. हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित झाल्यास ग्रामीण भागातील शेती आणि पाण्याचा प्रश्न कायमचा सुटू शकतो, हा विश्वास त्यांनी निर्माण केला.


 *चांदेकरांच्या पुढाकारामुळे विरोधकही जागे* 

विनोद चांदेकर यांनी या प्रकल्पाची वस्तुस्थिती जगासमोर मांडताच, वर्षानुवर्षे सुस्त बसलेले विरोधी पक्ष आता खडबडून जागे झाले आहेत. चांदेकरांच्या पावलावर पाऊल ठेवत आता विरोधकांनीही या प्रकल्पाच्या पुनर्निर्मितीचा प्रश्न शासन दरबारी मांडण्यास सुरुवात केली आहे.कोणताही राजकीय वारसा नसलेल्या एका व्यक्तीने शेतकरी हित जोपासत,केवळ आपल्या सामाजिक कर्तव्यातून संपूर्ण राजकीय व्यवस्थेला जागे करून सोडल्यामुळे सर्वसामान्य जनतेतून विनोद चांदेकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

------------------------------------------------------

 *बॉक्स ;-* 


 • सोनापूर - टोमटा प्रकल्प निधीअभावी रखडला असून,प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रकल्पाच्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करून मागणी केल्यास प्रकल्प पूर्णत्वास येऊ शकतो.


•  सोनापूर-टोमटा उपसा जलसिंचन योजनेचे काम  अंतिम टप्प्यात येऊन रखडला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास स्थानिक क्षेत्रातील शेतीला मोठा फायदा होऊन हा भाग सुजलाम् सुफलाम् होण्यास मोलाची मदत होईल.

Post a Comment

0 Comments