प्रमोद एन. चिंतलवार
तालुका प्रतिनिधी गडचिरोली
मो. नं. 9405133420
धानोरा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत दुधमाळा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात गावातील युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत बसस्थानक परिसराची स्वच्छता केली.
या उपक्रमातून ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ हा संदेश देत गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालय तसेच जिल्हा परिषद शाळा, दुधमाळा येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास माजी सरपंच माया उसेंडी, पोलीस पाटील उईके मॅडम, ग्रामपंचायत अधिकारी एम. बी. डोहे, ग्रामस्थ तसेच मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
स्वच्छता अभियानामुळे गावातील सार्वजनिक परिसर स्वच्छ झाला असून, युवकांच्या सहभागातून स्वच्छतेचा सकारात्मक संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचला.

Post a Comment
0 Comments