Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत युवानेते निलेश थोरे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी




प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ना.चंद्रकांतदादा पाटील,ना.मुरलीधर मोहोळ व माजी खासदार धैर्यशीलदादा पाटील यांच्या सूचनेनुसार निवडणूक प्रचारक म्हणून नियुक्ती


✍️ दिलीप करकरे ✍️

माणगाव, रायगड 

7208708456


माणगाव : आगामी पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष युवानेते निलेश कुंडलिक थोरे यांची निवडणूक प्रचारक म्हणून महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे.


भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रभारी ना.चंद्रकांतदादा पाटील, सहप्रभारी तथा केंद्रीय मंत्री ना.मुरलीधर मोहोळ आणि दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार धैर्यशीलदादा पाटील यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.


निलेश थोरे हे B.Tech. शिक्षण घेतलेले उच्चशिक्षित युवा नेतृत्व असून शिक्षक व पदवीधर मतदारांच्या प्रश्नांची जाण, त्यांच्याशी प्रभावी संवाद साधण्याची क्षमता आणि संघटनात्मक कामाचा अनुभव ही त्यांची प्रमुख बलस्थाने आहेत.


यापूर्वी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये प्रचाराचे नियोजन आणि पक्षाची संघटनात्मक यंत्रणा प्रभावीपणे राबविण्याचा अनुभव निलेश थोरे यांना आहे. बूथस्तरापासून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत समन्वय साधत कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याची त्यांची कार्यपद्धती पक्षात विशेष उल्लेखनीय मानली जाते.


दक्षिण रायगड जिल्ह्यात युवा मोर्चाच्या माध्यमातून विविध सामाजिक, संघटनात्मक आणि जनसेवेच्या उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी करताना त्यांनी तरुण कार्यकर्त्यांचे मजबूत नेटवर्क उभे करण्यावर विशेष भर दिला आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये सहज मिसळण्याची क्षमता, सातत्याने संवाद साधण्याची शैली आणि दिलेली जबाबदारी नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याची कार्यक्षमता यामुळे त्यांच्यावर पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे.


“शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू” — निलेश थोरे


नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना निलेश थोरे म्हणाले,


«“पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचारक म्हणून जबाबदारी सोपविल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळजी आणि दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानतो.”»


«“शिक्षक आणि पदवीधर हे समाजातील अत्यंत जागरूक व बुद्धिजीवी घटक आहेत. त्यांच्या अपेक्षा, प्रश्न आणि भूमिका समजून घेत त्यांच्याशी थेट संवाद साधणे, सरकारच्या विकासकामांची आणि जनहिताच्या निर्णयांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविणे, तसेच पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडणे यावर आमचा भर राहील.”»


«“कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अनुभव, भाजपाची मजबूत संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांची मेहनत यांच्या जोरावर पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेने काम करू.पक्षाने दिलेली ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानाची असून ती प्रामाणिकपणे आणि पूर्ण ताकदीने पार पाडेन.”»


निलेश थोरे यांच्या नियुक्तीमुळे दक्षिण रायगडमधील युवा नेतृत्वाला पुणे मतदारसंघाच्या महत्त्वाच्या निवडणूक प्रक्रियेत काम करण्याची महत्वाची संधी मिळाली असून,त्यांच्या संघटनात्मक अनुभवाचा आणि प्रचार नियोजनातील कौशल्याचा पक्षाला निश्चितच फायदा होईल, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments