Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

"सेवासंकल्प"अभियानांतर्गत भाजप पक्षाचे वतीने जेष्ठ नागरिकांना कार्ड वाटप.




तळा:किशोर पितळे:प्रतिनिधी

तळा :- तळा तालुका भाजप परिवार आणि जेष्ठ नागरीक संघटना यांचे संयुक्त विद्यमाने मोफत जेष्ठ नागरिक कार्ड वाटप उपक्रम राबविण्यात आला. १३आँक्टोबंर २६ रोजी तळा येथे देशाचे पंतप्रधान आदरणीय मा.नरेंद मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून"सेवा संकल्प" अभियान राबविले गेले . "मल्हार सेवा केंद्र "च्या संचालिका ज्योती पायगुडे  तसेच मंडळ अध्यक्ष कैलास जी पायगुडे, रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष ऍड. निलेश रातवडकर साहेब, तळा शहर अध्यक्ष ऍड. चेतन चव्हाण, सरचिटणीस राकेश कासार, युवा मोर्चा अध्यक्ष वैभव कदम, शहर मोर्चा तळा शहरअध्यक्ष सुयोग बारटक्के, मोरेश्वर गोरीवले,अमोल हाटकर, गंगाराम भोरावकर तसेच जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष मंगेश देशमुख, उपाध्यक्ष,पत्रकार  किशोर पितळे,खजीनदार दत्तात्रेय (अण्णा )कुंडे,सचिव महंमद भाई परदेशी सदस्य तसेच अनेक जेष्ठ नागरिक यावेळी उपस्थित राहून सदर सेवा संकल्प सेवेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून १२५लाभार्थ्यांनी लाभ घेतला सेवा संकल्प अभियान राबवून जेष्ठ नागरिकांना होणाऱा त्रास वेळ आणी आर्थिक बचत यामुळे जेष्ठांसाठी राबविलेला पहिलाच उपक्रम हाती घेतल्याने स्वागत आहे याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आहे जेष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष मंगेश देशमुख यांनी आभार व्यक्त केले व्यक्त केले.यावेळी कैलास पायगुडे म्हणाले की जेष्ठांचा सन्मान हिच खरी सेवा असून शासनाच्या ज्या ज्या जेष्ठ नागरिकांना सोयी सुविधा असतील उपलब्ध करून देण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे  सांगितले.जिल्हा ओबीसी अध्यक्ष एँड.निलेश रातवडकर म्हणाले की जेष्ठ नागरिकांना जन्माचा दाखला नसेल,किंवा शाळेतच गेलेले नाहीत तो दाखला मिळण्यासाठी मोठी खटपट करावी लागते प्रोसिजर मोठी आहे. हे कोर्टाकडून दाखला प्राप्त होतो जर कागदपत्रांची पुर्तता करून दिली तर जन्म दाखला मिळून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल शासकीय फी भरावी लागेल आमची विनामूल्य सेवा उपलब्ध करून दिली जाईल असे सांगितले.

Post a Comment

0 Comments